“धक्कातत्त्व”: पुस्तक-परिचय
एखाद्या राजवटीत जाणता अजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य? बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स …